Nojoto: Largest Storytelling Platform

#एकांतात भेटन जा.... तू लिहावं माझ्यासाठी बरीच स्व

#एकांतात भेटन जा....
तू लिहावं माझ्यासाठी बरीच स्वप्न मनी सजवतो आहे 
तुझा एक एक शब्द माझ्या काळजात घर करतो आहे 
कसं सांगू प्रिये तुला प्रेम माझं खरं की खोटं 
शब्दाचा वाटे तुज भुलावा मन कधीच नसे माझं थीटं 
तू माझी की मी तुझा हा प्रश्न नाही महत्वाचा 
प्रेम करावं निर्मळ मनावर भाव असावा केवळ भावनेचा
चल ना गडे पुन्हा आपण आपलं तरुणपण जगुन पाहू 
म्हातारपणाचं ओझे सारं प्रेम सरोवरात सोडून पाहू 
काय असतं जगणं मलाही आता कळायला लागलं 
जबाबदारीच्या ओझ्याखाली जीवन आपलं दबायला लागलं
 जे सुख माझ्या मनात आहेते शब्दात तू मांडत जा 
वाट पाहण्यात आयुष्य गेलं गं मग निदान शब्दातून तरी तू
कधी एकांतात येऊन भेटत जा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मी_अन्_तु