Nojoto: Largest Storytelling Platform

देशील का देवा माझी आई परत…? दाटला उरी हुंदका डोळ्

देशील का देवा माझी आई परत…?

दाटला उरी हुंदका डोळ्यात पाणी साठले
स्वार्थपरायण दुनियेत या असें कोण आपुलें?
मायेची ओल संपली ओसाड रंग फाकला
अंगणीची तुळस सुकली देव देव्हाऱ्यातूनी निघाला
तुझंवीण माय आता जगावे तरी कसें?
स्नेहाचे उमटलेले कसें पुसावे ठसे?
येता कुशीत तुझिया आश्वस्त जीव होता
चुकलेल्या वासराया वाट दावी कोण आता?
चिंता भार माझा आज कोण तो वाहतो?
प्रकाशण्या मजं नितं काजव्यासम जागतो
न बोलताही भाव माझें अंतरीयां तुझीयां ठावें
नितं स्मरावे माय तुजला मी रोज रोज गावे
कोसतो मी स्वतःला कमनशिबी असा अभागा
उबदार गोधडीचा आज उसवलासे धागा
सरली हयांत माझी आठवे रडत रडत
देशील का देवा माझी आई परत…..?

©Shankar kamble #आई 
#आईवडील 
#हुंदका 
#मातृदिवस 
#मातृदिन 
#माँ 
#अनाथ
देशील का देवा माझी आई परत…?

दाटला उरी हुंदका डोळ्यात पाणी साठले
स्वार्थपरायण दुनियेत या असें कोण आपुलें?
मायेची ओल संपली ओसाड रंग फाकला
अंगणीची तुळस सुकली देव देव्हाऱ्यातूनी निघाला
तुझंवीण माय आता जगावे तरी कसें?
स्नेहाचे उमटलेले कसें पुसावे ठसे?
येता कुशीत तुझिया आश्वस्त जीव होता
चुकलेल्या वासराया वाट दावी कोण आता?
चिंता भार माझा आज कोण तो वाहतो?
प्रकाशण्या मजं नितं काजव्यासम जागतो
न बोलताही भाव माझें अंतरीयां तुझीयां ठावें
नितं स्मरावे माय तुजला मी रोज रोज गावे
कोसतो मी स्वतःला कमनशिबी असा अभागा
उबदार गोधडीचा आज उसवलासे धागा
सरली हयांत माझी आठवे रडत रडत
देशील का देवा माझी आई परत…..?

©Shankar kamble #आई 
#आईवडील 
#हुंदका 
#मातृदिवस 
#मातृदिन 
#माँ 
#अनाथ