आज ऑफिस ला जायला तयार होऊन.. आईसमोर आलो..म्हणालो... 'आई मला खेळायला जायचंय.जाऊ दे नंव...' आठवले ते आईला ही दिवस..माझा खोडकर पणा. अशीच परवानगी घेऊन मी जायचो खेळायला.. आईचे डोळे भरून आले..... जवळ बोलावलं...चेहऱ्यावर हात फिरवला.. काहीतरी दुष्ट काढतात तस काहीतरी केलं.. आणि बोलली..जा आता ऑफिस ला...! आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!