आयुष्याची शाळा मोठी अवघड आहे अनुभूतीचा शिक्षक मोठा जालिम आहे रोज उत्तरे वेगवेगळी मागे बाई न संपणारा सराव इथला कठीण आहे बघून लिहिण्या दुसऱ्याचे ती मुभाच नाही प्रत्येकाचा पेपर इथला स्वतंत्र आहे पडलो झडलो तरी न कोणा चिंता कसली जो तो येथे गर्क आपल्या धुंदित आहे निकाल केव्हा असे आपला माहित नाही जरी परीक्षा क्षणोक्षणीची रोजच आहे मृत्यूद्वारी हिशोब होतो चोख सर्वथा जमा खर्च तो कर्मफलाचा समान आहे ----उमा जोशी १७/०३/२०२१ ©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #कर्मफल #अनलज्वाला #colours