बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे. लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही, किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही. बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात, तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात. आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण. वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी, जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची. आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची. लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती, लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती. ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते, गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते. लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता. कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता. आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.