"कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...! वादळाच्या नुसत्या चाहुलीनेच चक्रावून गेलास... किती रुपे बदललीस...??? कावराबावरा झालास आज हवाहवासा वाटतोय ना एकांत ... समजलं ना तुला "समजावणं किती सोपं असतं.... समजून घेणं अवघड असतं...!" --प्रेरणा "कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...!