#आशा तुझ्या धुंदीत जगण्याची ती नशाच वेगळी मन हरपुन भटकण्याची ती दिशाच वेगळी मागे सरले ते क्षण आनंदी सुखाचे भान हरवून जगण्याची आशाच वेगळी बहाणा होता तुझा सोडुन जाण्याचा बेभान भटकणाऱ्या मुसाफिराची निशाच वेगळी चालता चालता ठेच पायास लागली घाव पायाला वेदनेची दशाच वेगळी झाले गेले सर्व विसरून गेलो मी ठरणा-या भविष्याची ती निराशाच वेगळी भाळलो नाही मी दिसणा-या सौंदर्यावर फक्त मनाच्या मिलनाची अपेक्षाच वेगळी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #तुझीओढ