Nojoto: Largest Storytelling Platform

सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मना

 सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या नाहीत . तेव्हा ज्या समस्या होत्या त्या आजही तशाच आहेत . काही मोजक्या क्षेत्रात कामे झाली असतील पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी आजही त्यांच्या अडचणी तशाच झेलत मोठ्या हिमतीने नेत्यांच्या खोट्या आश्र्वासनांवर मनापासून विश्वास ठेवून जगत आहे ....
वीज पाणी रस्ते आणि शेतमालाला योग्य हमीभाव यावर हवे तसे ग्रामीण भागात भरपूर प्रमाणात कामे सुरु झालीच नाहीत . 
कित्येक पक्षांची सरकारे आली आणि गेली आणि शेतकरी मात्र तसाच आहे .
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेते शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येतात आणि त्यांच्या समस्या तशाच भिजत ठेवतात .
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणत्याही सरकारला बंद करणे जमले नाही किंवा तसा प्रामाणिक प्रयत्न केला जात नव्हता .
आता शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही आले तरी ते समस्या सोडवणार नाहीत . यावर उपाय एकच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांनी एकी करुन कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्यांचे राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन सरकारला टप्प्या टप्प्याने एका पंचवार्षिक योजनेत वीज एका पंचवार्षिक योजनेत पाणी आणि सोबत शेतमालाला हमीभाव यावर कायमस्वरूपी ठोस काम व उपाययोजना करावयास लिखित स्वरूपात घेऊन भाग पाडावे अन्यथा सामुहिकपणे मतदानावर बहिष्कार टाकावा . त्यामुळे कोणत्याही नेत्याला पक्षाला मतदान होणार नाही आणि सरकार देखील बनणार नाही . सरकार काम नाही करणार तर कोणाला पण मत नाही देणार .
जे खरोखरच काम करतील त्यांनाच मतदान केले जाईल .✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator