#दारूणाई (दारू+तरुणाई) दारूच्या वाटेवर तरुणाई गजबजू लागली संसार चव्हाट्यावर, बायकापोरं आई, धुसमुसू लागली नंगा नाच करणारी झिंग ही कसली असंगा हाच म्हणणारी पुल्लिंग ही नासली दारूच्या वाटेवर...... पोटच्या बाळाची आबाळ करणारी, व्यसनं ही कसली पुढच्या काळाची राळ वरणारी, दूषणं देवा देत बसली दीडदमडी खिशात, तालेवार रूबाबात, नागमोडी वळली आक्खी बाटली घशात, वाऱ्यावर वरात झुलायला लागली दारूच्या वाटेवर...... गुन्हा ज्या डोळ्यांनी हे पाहिलं, तेच डोळे पुन्हा ज्या हातांनी सावरलं, तेच हात पुन्हा ज्या मनानी दारूचा, दारुड्या बापाचा, तिरस्कार केला तेच मन पुन्हा ज्या व्यसनांनी, व्यासंग शिक्षणाचा तोडला, तेच व्यसन पुन्हा दारूच्या वाटेवर...... समाज बदलायला, समाजात समज यायला हवी आज सुधारायला, आदरात आब राखायला पिढी नवी आदर्श जगणं नसलं तरी बेहत्तर फक्त समंजस पावलं वळायला नको दारूच्या वाटेवर...... #rayofhope #nextgeneration #say_no_to_liquor #darubandi #is_it_that_casual #economy_booster_like_seriously #wakeupyouth #wrongway #indianyouth #poem