मिळालेल्या कडूगोड अनुभवांना अगदी दाबून ठोकून ऊभं केलंय घरांच्या मेढी म्हणून... तरीही चुकार आठवणींना मात्र संयम कसा तो माहीतच नाही.. कधीतरी येतात वळचणीतून बाहेर अन् ऊभ्या राहतात खिडक्यांत.. तावदानांचा आवाज होत राहतो सारखा टकटक,... टकटक... टकटक नको नको करतो कानांना.... तरीही वाजतच राहतात केंव्हातरी भुर्रकन उडून जातात मग खिडकीतून... वार्यासोबत ढग बनतात मग गळत राहतात पागोळ्यांतून टपटप...टपटप..टपटप...!! दीप...!!