Nojoto: Largest Storytelling Platform

White जितकं भरभरून आपण कुणावर प्रेम करतो त्या बदल्

White जितकं भरभरून आपण कुणावर प्रेम करतो त्या बदल्यात
त्याने आपल्यावर तितकंसं प्रेम न करावं या भावनेने काळजात
काहीतरी हलत राहतं...इथे मग ती दोन माणसं, त्यांचं मन,
त्यांच्या इच्छा अधांतरित असतात...त्यांना मागे वळता येत नाही
आणि पुढे जाण्याचा मार्ग बंद झालेला असतो...
अशातच कित्येक प्रेम कहाण्या जीव देऊ लागतात, ते प्रेम
कमी पडतं यामुळे नाही तर प्रेमाने एकमेकांना प्रेम कसं करावं
हे ते समजावू शकत नाहीत...तसं प्रेम ही काही समजावून सांगण्याची
गोष्ट नाही म्हणा, पण प्रेम आहे हे जो कबूल करतो त्याला ते प्रेम
मरणोत्तर टिकवता आलंच पाहिजे...ते टिकवणं त्याला जड जाऊ
लागलं तर विनाश ठरलेला आहे. 
आपलं ही असंच काहीतरी होण्याच्या मार्गावर सध्या उभे
आहोत आपण...नाही का ?

कशी स्वतःची सुटका व्हावी, तुझ्यात अडकल्यावर,
किनारा सामावून घेतोच ना रे, लाट धडकल्यावर...
प्रेम आहे म्हणतोस अन् तितकासा व्यक्त होत नाहीस,
बरसण्याचा नियम असावा पावसाला, विज कडाडल्यावर...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #moon_day