Nojoto: Largest Storytelling Platform

माणुसकीने नावालाही जगता आले नाही मनाप्रमाणे या दे

माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही
माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही