Nojoto: Largest Storytelling Platform

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज

 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. 
या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. 
दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. 
पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे श्रावण पाळत नाहीत तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात...शैलेश हिंदळेकर