Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस आला की असच होणार हातातली कामं बाजूला पडणार

पाऊस आला की असच होणार
हातातली कामं बाजूला पडणार
मन चिंब चिंब होणार
आणि अंग अंग भिजणार
पावसात भिजतांना गफलत होणार
कोणी मनसोक्त भिजून हसणार
तर कोणी मनातलं दुःख
त्या बेधुंद पावसात वाहणार
मग चहाची तलब लागणार
त्या सोबत भजी मागणार
टेबलावरचा वाफळलेला चहा
जुन्या आठवणीत न्हेणार

मग रेडिओवर गाणं वाजणार
आणि नेमकं ते आवडीचं असणार
मन जरा विचलित होणार
आणि एका एक डोळे भरणार
थोडा वेळ आठवणींचे ढग दाटणार
डोळयातून मुसळधार पाऊस पडणार
मग छपरावरून पडणाऱ्या थेंबांना
तुम्ही तळ हातावर झेलणार
अचानक पाऊस थांबणार
मन हलकं हलकं होणार
दीर्घ श्वास घेऊन….
तुम्ही शांतपने बसणार
क्षणात शांतता पसरणार
आणि मग आठवणींची भुतं 
…….. तुम्हाला घेरणार
पाऊस आला की असच होणार 
         - राशि

rakeshkavita.blogspot.in

©Rashi पाऊस आला की असच होणार #marathikavita #marathipoem #marathipoetry #NojotoPune #NojotoMarathiKavita #Paaus #themb
पाऊस आला की असच होणार
हातातली कामं बाजूला पडणार
मन चिंब चिंब होणार
आणि अंग अंग भिजणार
पावसात भिजतांना गफलत होणार
कोणी मनसोक्त भिजून हसणार
तर कोणी मनातलं दुःख
त्या बेधुंद पावसात वाहणार
मग चहाची तलब लागणार
त्या सोबत भजी मागणार
टेबलावरचा वाफळलेला चहा
जुन्या आठवणीत न्हेणार

मग रेडिओवर गाणं वाजणार
आणि नेमकं ते आवडीचं असणार
मन जरा विचलित होणार
आणि एका एक डोळे भरणार
थोडा वेळ आठवणींचे ढग दाटणार
डोळयातून मुसळधार पाऊस पडणार
मग छपरावरून पडणाऱ्या थेंबांना
तुम्ही तळ हातावर झेलणार
अचानक पाऊस थांबणार
मन हलकं हलकं होणार
दीर्घ श्वास घेऊन….
तुम्ही शांतपने बसणार
क्षणात शांतता पसरणार
आणि मग आठवणींची भुतं 
…….. तुम्हाला घेरणार
पाऊस आला की असच होणार 
         - राशि

rakeshkavita.blogspot.in

©Rashi पाऊस आला की असच होणार #marathikavita #marathipoem #marathipoetry #NojotoPune #NojotoMarathiKavita #Paaus #themb
rakeshshinde0428

Rashi

Growing Creator