कटू वास्तवाला दुरापास्त केले स्वपक्षात माझे जिणे रास्त केले म्हणालो करावी जरा देश सेवा स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले नवे मित्र काही जुन्या धारणांचे खुलेआम वागून बिनधास्त केले बरे भासणारे बुरे तावणारे इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले कुणा हिकमतीचा न अंदाज आला खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले भुलाया असे घोर उपद्व्याप माझे अता रोज रात्री पिणे जास्त केले सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh पिणे जास्त केले #Rose