शुभ दीपावली मना सज्जना नाही संग माझा दुर्जनांचा मना सज्जना संगती सारे माझे देव मनाचे मना सज्जना आज साऱ्या आठवणी साऱ्या त्या दाटल्या मना सज्जना गड एक पावन स्थान होतो तेथे स्वामींचा निनाद मना सज्जना राम तो चिंतित जातो राम प्रहरी मना सज्जना ना चिंता बाळगी मनी उरी असा सज्जना चा गड तो पुरातन राम दासी पावन तो जाहला मना सज्जना आठवण त्या पराक्रम शिवबा चा मना सज्जना एक आदर्श राजा होऊन गेला स्वराज ला मान देऊन गेला मना सज्जना वाढला तो सज्जनाचा सहवास मन शांत होते अस्तित्व जाणतो उपकार सारे कसे ते विसरू एक मनःशांती चे मन मंत्र उरी कोरून गेला मना सज्जना मागणे एक आता हा एक मार्ग मोकळा सारा पावन होईल सारे जीवन सुखी कल्याण कारी ना करू निंदा नालस्ती दुर्जन आता उरणार नाही