Nojoto: Largest Storytelling Platform

सोबती सोडताना गाव हा का असा थांबलो ना कळे कोणत्या

सोबती
सोडताना गाव हा का असा थांबलो
ना कळे कोणत्या रेशमा नी बांधलो..
फाटलेला असा इथे आलो मी एकदा
परतुनी चालताना पुरता मी  सांधलो..
प्रवासी मी परतीचा थांबलो होतो इथे
संपला मुक्काम तरी कैफात ना झिंगलो
सोबतीस होती माझ्या दुःख आणिवेदना
चांदण्यांची फुले इथे वेचूनिया चाललो..
जिंदगीचा ना  कुणी  इथे माझा सोबती
भेटली ती सर्व नाती सोडुनीया चाललो..
            -------

 कवी - शहाजीकुमार चंदनशिवे,  
अकोला ता.सांगोला जि.सोलापूर

©Shahaji Chandanshive सोबती 

#SunSet
सोबती
सोडताना गाव हा का असा थांबलो
ना कळे कोणत्या रेशमा नी बांधलो..
फाटलेला असा इथे आलो मी एकदा
परतुनी चालताना पुरता मी  सांधलो..
प्रवासी मी परतीचा थांबलो होतो इथे
संपला मुक्काम तरी कैफात ना झिंगलो
सोबतीस होती माझ्या दुःख आणिवेदना
चांदण्यांची फुले इथे वेचूनिया चाललो..
जिंदगीचा ना  कुणी  इथे माझा सोबती
भेटली ती सर्व नाती सोडुनीया चाललो..
            -------

 कवी - शहाजीकुमार चंदनशिवे,  
अकोला ता.सांगोला जि.सोलापूर

©Shahaji Chandanshive सोबती 

#SunSet