Nojoto: Largest Storytelling Platform

मला बरं वाटावं म्हणून तरी काही कर मला खरं वाटावं

मला बरं वाटावं 
म्हणून तरी काही कर 
मला खरं वाटावं 
असं काहीतरी कर..

नको दाखवू जगाला 
माझ्यापुरतं तरी कर 
मनाला समाधान होईल 
एवढं तरी प्रयत्न कर..

फार अपेक्षा नाही माझ्या 
थोडेच स्वप्न पूर्ण कर 
आहे माझ्याही आयुष्यात 
असेही काही कर..

चालेल दोघांमध्येच राहूदे 
अनं सगळ्यांना अनभिज्ञ कर 
तूझ्या सोशिअल मीडिया च्या जगात 
मला सुद्धा कधीतरी सामील कर..

आशा नको दाखवू मला,पण 
वेळेपूरता तरी आनंदी कर 
सात जन्म कोण बघितलं 
ह्याच जन्मात मला आपलं कर..

खरंच फार काही अपेक्षा नाही माझ्या 
फक्त प्रेयसी म्हणून प्रेम कर 
नाहीतर खोटी आशा देण्यापेक्षा 
शेवटचा एकदा माझा गेम कर..

दिसतच नाही माझं अस्तित्व कुठे 
मला आवडेल असं काही कर 
आहे कुणीतरी प्रेम करणारी 
असं भास नको तर तू हे खरं कर..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #GoodMorning  one sided love quotes sad for him
मला बरं वाटावं 
म्हणून तरी काही कर 
मला खरं वाटावं 
असं काहीतरी कर..

नको दाखवू जगाला 
माझ्यापुरतं तरी कर 
मनाला समाधान होईल 
एवढं तरी प्रयत्न कर..

फार अपेक्षा नाही माझ्या 
थोडेच स्वप्न पूर्ण कर 
आहे माझ्याही आयुष्यात 
असेही काही कर..

चालेल दोघांमध्येच राहूदे 
अनं सगळ्यांना अनभिज्ञ कर 
तूझ्या सोशिअल मीडिया च्या जगात 
मला सुद्धा कधीतरी सामील कर..

आशा नको दाखवू मला,पण 
वेळेपूरता तरी आनंदी कर 
सात जन्म कोण बघितलं 
ह्याच जन्मात मला आपलं कर..

खरंच फार काही अपेक्षा नाही माझ्या 
फक्त प्रेयसी म्हणून प्रेम कर 
नाहीतर खोटी आशा देण्यापेक्षा 
शेवटचा एकदा माझा गेम कर..

दिसतच नाही माझं अस्तित्व कुठे 
मला आवडेल असं काही कर 
आहे कुणीतरी प्रेम करणारी 
असं भास नको तर तू हे खरं कर..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #GoodMorning  one sided love quotes sad for him