Nojoto: Largest Storytelling Platform

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा परत येऊन जन्मा

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा 
परत येऊन जन्माला मी तुला रोज दंडवत द्यावा .........

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा 
राहिले जे काम अधुरे ते पूर्ण करण्यास वेळ द्यावा .........

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा 
येऊन पुन्हा या जगात मला तिचाच सहवास हवा .......... 

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा 
नाही सोबत सखीची तिला पुढच्या जन्मात माझीच लिहा ........

कोणी म्हणतो देवा नको तो पुनर्जन्म 
या जन्माच ऋण आताच फेडाव ........

कोणी म्हणतो देवा नको तो पुनर्जन्म 
याच आयुष्यात आलाय कंटाळा पुढे दुसरा कशाला हवा.......... 

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा 
पुढच्या जन्मी मला श्रीमंत घरी पाठवा ........

कोणी म्हणतो देवा नको तो पुनर्जन्म 
इथे नाहीत कोणी कोणा समजून घेत ना उमजते दुवा .........

कोणी म्हणतो देवा नको तो पुनर्जन्म 
आताच घे बोलवून हा जन्म गेला वाया ........

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा
पुरला नाही जन्म माझी स्वप्न पुरी कराया ........

कोणी म्हणतो देवा मला पुनर्जन्म हवा
पुढचा जन्म मला माझे हेच कुटुंब द्यावा..........

कोणी म्हणतो देवा आहे मी तुझा ऋणी
तू दिले खूप आजवर आता कशाचाही मोह नाही.........

कोणी म्हणत देवा दिलाच तू पुनर्जन्म तर 
पशु पक्ष्याचा द्यावा नको ती मनुष्य जात इथे एकमेकांत हेवा ......

©Shailee Rodrigues
  #chaand #Poetry #Nojoto #Punarjanm #Life #Love #poem

#chaand Poetry Nojoto #Punarjanm Life Love #poem

515 Views