Coffee....(लेख 👇) दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवार भेटत राहतात, त्यांना पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा मनात निर्माण होते.काही व्यक्ती कधीच भेटलेल्या नसतात परंतु आयुष्यात एकदातरी भेटाव्यात असं वाटतं.या सर्व गोष्टींचा विचार मनात येतो तेव्हा नकळत मला Nescafe Gold च्या जाहिरातीची जरुर आठवण येते. या जाहिरातीत नायकाला त्याला त्याच्या आयुष्यात विविध ठिकाणी भेटलेल्या लोकांनी पूर्णतः भरलेलं असतं. नायक स्टेजवर येऊन