#OpenPoetry लेकरा माझ्या सानुल्या आज हवेत तुला खेळवतोय रे मी उद्या मोठा होऊन मात्र तू तुझ्या बापाला लाथ नको मारू जशी त्याने मला मारली आहे.... त्याच्या कामासाठी मी फक्त रामागडी झालोय. पण तुझ्या तोंडावरील हासू पाहून माझ्या डोळ्यातील दुःखी आसवांना आनंदाची भरती येतेय रे बाळा. तू आहेस गोंडस नटखट म्हणून माझी सखी आणि मी तडफडत जगतोय रे बाळा तुझ्या बापाला जन्म दिला मोठं केलं शेतात राब राबून अंगात बळ दिलं मोठाले शिक्षण दिलं बाप मोठा झाला शहरात साहेब झाला आणि आम्हाला तसेच ठेवलं झोपडीत....नेहमीच्याच... आम्ही माय बापानं पाहिलेली आभाळभर स्वप्न मातीत मेली रे मातील मेली.... निदान तू तरी मोठा होऊन तुझ्या बापाच्या चुका तेव्हा लक्षात आणून दे जेव्हा तो त्याची नातवंत खेळवीत असेल नातवंड खेळवीत असेल. कुठेतरी आम्हाला आठवून... कदाचित..... कवी- तुषार गौतम नेवरेकर 7218467963 लेकरा