Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी मी मांडते जुन्या आठवणींचा पसारा हरवते का

कधी कधी मी मांडते 
जुन्या आठवणींचा पसारा 
हरवते काही क्षण
मिरवते काही क्षण 
कधी कधी उलगडतो पट
अलवार जपलेल्या नात्यांचा
गुंत्यात गुंतते नकळत मन
सापडतात मग सोनेरी पान
कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं
लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं
अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही
अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही
कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं
स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं
हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस
स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस
कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन
अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून
तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही
सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही

 #कधी कधी