Nojoto: Largest Storytelling Platform

लहरी वर्षाराणी लहरी वर्षाराणी दौडत येते गगनी मेघा

लहरी वर्षाराणी

लहरी वर्षाराणी दौडत येते गगनी
मेघांचे सैन्य घेऊनी सुंदर करण्या अवनी

ही इंद्रधनूची जननी इथे जन्मे सौदामिनी
सूर्य झाके सहस्त्रकरांनी हिचमुळे जीवित प्राणी

कधी करे पाणी पाणी गाव वेढे महापूरांनी
तर कधी दुष्काळांनी आणि सर्वांचे डोळा पाणी

कधी पडे धुके व दव कधी गारांचा वर्षाव
कधी पडे ते हिमहिव तर कधी सरीवर सरी

बुध्दिमान मानवप्राणी करी निसर्गहानी
दूषित अन्नपाणी करी दूषित हवा ध्वनी

मानवा सावध होऊनी वाचव वने व प्राणी
वाचव पर्यावरण पाणीविनाश आला पुढे होऊनी

रूसता वर्षाराणी होईल जीवितहानी
 प्रसन्न करी वर्षाराणी प्रसन्न करण्या धरणी लहरी वर्षाराणी
लहरी वर्षाराणी

लहरी वर्षाराणी दौडत येते गगनी
मेघांचे सैन्य घेऊनी सुंदर करण्या अवनी

ही इंद्रधनूची जननी इथे जन्मे सौदामिनी
सूर्य झाके सहस्त्रकरांनी हिचमुळे जीवित प्राणी

कधी करे पाणी पाणी गाव वेढे महापूरांनी
तर कधी दुष्काळांनी आणि सर्वांचे डोळा पाणी

कधी पडे धुके व दव कधी गारांचा वर्षाव
कधी पडे ते हिमहिव तर कधी सरीवर सरी

बुध्दिमान मानवप्राणी करी निसर्गहानी
दूषित अन्नपाणी करी दूषित हवा ध्वनी

मानवा सावध होऊनी वाचव वने व प्राणी
वाचव पर्यावरण पाणीविनाश आला पुढे होऊनी

रूसता वर्षाराणी होईल जीवितहानी
 प्रसन्न करी वर्षाराणी प्रसन्न करण्या धरणी लहरी वर्षाराणी