Nojoto: Largest Storytelling Platform

माणसं जाती-जातीत फूट पाडतात माणसं घरा-घरात काडी ओढ

माणसं
जाती-जातीत फूट पाडतात माणसं
घरा-घरात काडी ओढतात माणसं
भावा-भावात वैर पेटवतात माणसं
बहिण-भावात भेद करतात माणसं
माय-लेकरात वितुष्ट आणतात माणसं
बाप-लेकात भांडण लावतात माणसं
भावकीत आग भडकावतात माणसं
ऑफिसातही वाकडं वागतात माणसं
पायात पाय घालतात माणसं
अचानक तोंडावर पाडतात माणसं
तोंडावर चांगलं बोलतात माणसं
पाठीमागे नावं ठेवतात माणसं
गरजेला हात पसरतात माणसं
गरज संपल्यावर विसरतात माणसं
वेळ आल्यावर हसतात माणसं
चांगलं झाल्यावर जळतात माणसं
खऱ्याला खोटं म्हणतात माणसं
खोट्याला खरं मानतात माणसं
सरड्यासारखी रंग बदलतात माणसं
सापापेक्षा विषारी असतात माणसं
चांगलीही असतात कितीतरी माणसं
ओळखून घ्या चांगली माणसं
                       ~ दादा भोसले दादा
माणसं
जाती-जातीत फूट पाडतात माणसं
घरा-घरात काडी ओढतात माणसं
भावा-भावात वैर पेटवतात माणसं
बहिण-भावात भेद करतात माणसं
माय-लेकरात वितुष्ट आणतात माणसं
बाप-लेकात भांडण लावतात माणसं
भावकीत आग भडकावतात माणसं
ऑफिसातही वाकडं वागतात माणसं
पायात पाय घालतात माणसं
अचानक तोंडावर पाडतात माणसं
तोंडावर चांगलं बोलतात माणसं
पाठीमागे नावं ठेवतात माणसं
गरजेला हात पसरतात माणसं
गरज संपल्यावर विसरतात माणसं
वेळ आल्यावर हसतात माणसं
चांगलं झाल्यावर जळतात माणसं
खऱ्याला खोटं म्हणतात माणसं
खोट्याला खरं मानतात माणसं
सरड्यासारखी रंग बदलतात माणसं
सापापेक्षा विषारी असतात माणसं
चांगलीही असतात कितीतरी माणसं
ओळखून घ्या चांगली माणसं
                       ~ दादा भोसले दादा
dmbhosale7402

D.M Bhosale

New Creator