व्याकुळ ती वाट होती प्रितीची ती साथ होती थबकले पाय तरी चालण्यासाठी आतुर होती... चांदण्याची साथ होती चंद्राची सावली होती हळुवार चाल तू म्हणणारी फुललेली ती रात्र होती... घट्ट हात पकडून ठेचाळणार्या वळणाला दूर सारणारी ती व्याकुळ वाट होती.. प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1