Mind and Battle रोज मनाला सांगावं लागतं अरे थांब बाबा तू श्वासाच्या पुढे चाललाय श्वास आहे जगवायला त्याच्या गतीत सदगती घे अंतर वाढत जाऊन खोल दरीत क्षती होण्याआधी यती घे कुणास ठाऊक कुठल्या शर्यतीत धावायला लागलाय अरे थांब बाबा तू श्वासाच्या पुढे चाललाय श्वासानं सांभाळलाय आजवर देह तुही त्याच्याशी एकसंध होऊन आजमाव ऊहापोह तुझ्या थकव्यापायी देह ही भांबावलाय अरे थांब बाबा तू श्वासाच्या पुढे चाललाय असशील तू धनी ह्या देहाचा शिरजोर तुझा कुठवर सह्य होईल देहाचं ठीके पण धडपडण्याच्या जखमांना तुझ्या काय ईलाज ग्राह्य राहील तुझी मनमानी तुझीच कहाणी अर्ध्यावर सोडायला लागलाय अरे थांब बाबा तू श्वासाच्या पुढे चाललाय पुरे आता अडखळणं देहाचं अन तुझं, पुरे डामडौल श्वासाची अन मनाची गट्टी होऊदे येऊदे समतोल सावरणार मन तू, आवारणारा श्वास वेठीस धरलाय अरे थांब बाबा तू श्वासाच्या पुढे चाललाय #rayofhope let's hold our restless wishful mind to uphold our breath. ©rayansh #rayofhope #shwas #staypatient #staysafe #IndiaFightsCorona #Life #Mind