मैत्री आमची... ( कॅप्शन मधील वाचावे ) खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️ @manishadongrekulkarni #manishadongrekulkarni ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे मैत्री आमची YQ वरची. "मनिषा" नाव तिचे सॉरी तिचे नाही त्यांचे,त्या ज्या हिंदी गजल मराठीत अनुवादीत करून लिहितात. इथे YQ वर आमची पहिली ओळख झाली ती आजवर आहे आणि जोपर्यंत YQ राहील तो पर्यंत तरी नक्कीच राहील. कारण गेल्या दोन/तीन वर्षात आम्ही खुप गप्पा मारल्या आणि खुप भांडणे ही केली,पण..ही भांडणे जी झालीत ती त्यांच्याकडून झालीत माझ्याकडून नाही.🤭 आमची भांडणे ही जास्त वेळ कधीच टिकली नाहीत..का..तर,माझा स्वभाव.. विसरभोला मी. आमच्यात झालेली भांडणे मी लगेच विसरतो आणि कधी कधी म्हणजे क्वचितच कधी तरी त्या ही विसरतात आणि स्वतःची चूक मानतात.😆