आता कळणार नाही कुणाला पण एक दिवस नक्कीच कळणार सगळ्यांना तुझ्या या स्वप्नांची ताकद तेव्हा मग ते असेच करतील तुझेच दाखले सांगून म्हणतील करू नकोस कधीही स्वप्नांची परवड उद्यावर मात करण्यास आज स्वप्न सोनपंखी पहावेच लागतील अन् जिद्द बाणवावी लागेल कणखर कधी तरी तो रविराज ही मग तुझीच आभा अस्मानी उजळेल सर्वत्र दरवळेल जसा तुझाच परिमळ परीस्थितीच्या चिवटपणावर मेहनतीचे सखोल वार केल्यावर धुळ अग्नीपथाची पसरेल आभाळभर शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... #स्वप्नांचीताकद #ताकद ~युगंधरा~ यांचा हा विषय आहे. चला तर आता यावर लिहुया.