सहचारीणी यौवनाच्या त्या उंबरठ्यावरूनी देता साद तू आलीस धावूनी सखी सजनी गं सहचारीणी माझी जणु तु जीवनस्वरागिनी झालीस तूच मम अर्धांगिनी भेट तुझी झाली ती अवचित पाहता एकमेकांना जेव्हा मने आपली झाली स्तिमित तुज रूपाचे पडे चांदणे जणु त्या तप्त आयुष्यउन्हात मुग्ध ते हास्य तव गालात ऋतू वसंत येई या जीवनी मनी कोकीळ गुंजे मोहरूनी सुगंध दरवळे मग माझ्या मनीची प्रीतकळी उमलुनी गंधाळतो मग चाफा तेव्हा तुला पाहूनी आलीस तू त्या चांदण्यांच्या धुंद पावलांनी संचिताचे सूर माझ्या संसारी छेडूनी ध्यास अंतरीचा घेत संगती विश्वासूनी स्वप्न सत्यात आणीलेस तु उतरवुनी अंतर्यामी मग मच मनीचा नवा सप्तसुरांचा कोहीनुर गवसला जन्मोजन्मीची ती खून पटे जीवाला सांज ही काजळताना मग जीव दाटला नियतीचा खेळ असे नव्यानं हाती मजला गवसलेला ©शब्दवेडा किशोर #तुआणिमी