Nojoto: Largest Storytelling Platform

आठवतं का तुला आपण कधी वेगळे होणार नाही व आपलं नातं

आठवतं का तुला
आपण कधी वेगळे होणार नाही व
आपलं नातं तुटणार नाही असं तु नेहमीच म्हणायची..
जेव्हा तुला माझं मध्यमवर्गीय अन्
जरासं गरीबीनं भारलेलं आयुष्य दिसलं
तेव्हा कुणी कितीही तुला मला स्वतःपासून
दुर करायला सांगितलं तरीही तु त्यांना टाळायची..
खूपच छान नातं आपुलं बहरलं अन्
एक दिवस अचानक नियतीच आपल्यावर उलटली..
अन् 
दुनियेच्या गर्दीत मी तुला गमावलं..
अन् नशिबाचा खेळ बघ ना..
आज पुन्हा देवानं आपल्याला एकमेकांशी भेटवुन दिलं..
मला स्वतःपासून तोडून तु आनंदी झाली असशीलच पण
तुझ्यातंच सुरू होऊन तुझ्यातंच विरणारा मी मात्र 
काळानं बसवलेल्या अनेक तडाख्यात स्वतःसाठीच कधी परका झालो कळलंच नाही.
ये ना परतुनी पुन्हा पूर्वीसम माझी सावली बनुन
अन् दे पुन्हा नव्यानं साथ मला
घे हातात हात अन् पुन्हा कर सुरूवात नव्यानं सोबत
ही आयुष्याची तप्तपदी चालण्याची..

©शब्दवेडा किशोर #holdmyhand  uday pawar नंदिनी  सुकाळे