White बाजूस काठ दोन्ही अन् आत भोवरा ठरवू कसे? जिवाचा वळवू कुठे झरा वरवर स्वरूप माझे जे पाहिलेस तू तो मी नव्हे, न माझा तो चेहरा खरा त्याची दरार होऊ शकते पुढे कधी जो वाटतोय सध्या साधासुधा चरा सगळी भडास निघते कविते तुझ्यामुळे तू सोबतीण माझी अन् तूच मोहरा संकल्प तोडण्याची आलीच वेळ तर शोधून ठेव नाथा तू एक आसरा एकनाथ ©Eknath Dhanke #emotional_sad_shayari