कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला नव्हताच दोष तिचा कुठला न तिची वाटही नव्हती चुकली तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली नालायक पणे तू माणुसकी भोसकला कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले कसा रे मर्दा तू माणुसकी विसरला माझ्या लेखणीतून माझ्या लेखणीतून