ज्याच्या अंगा खांद्यावर खेळलो ज्यान मला बोट धरून चालायला शिकवलं ज्यानं मला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ज्यांनी मला अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं ज्यानं माझ्या सुखासाठी आयुष्यभर धडपड केली ज्यानं माझ्यासाठी आपल्या कातद्याचे जोडे झीजवले... ज्यानं मला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपल त्या बापाच्या शेवटच्या क्षणी मला साधं त्याच्या ओठात पाणी सुध्दा घालायला जमल नाही... त्याच्या सुखासाठी मी काहीही करू शकलो नाही जेव्हा परतफेड करायला जमल नव्हतं तेव्हा मात्र अपराधी वाटल होत... ©Shubhangi Sutar #अपराधी......