Nojoto: Largest Storytelling Platform

माणूस माणसाला का छळतो येथे उगाचच मुकजीवांना का प

माणूस माणसाला का छळतो येथे 
उगाचच  मुकजीवांना का पाळतो येथे.

नाही येथे कदर थोडीही माणूसकीची
भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे

वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही
मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे

काचाही मनाच्या साफ करावी माणसाने
सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे

आपल्या लाभासाठी  भांडतो हा माणसाशी
देवास  काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..
माणूस माणसाला का छळतो येथे 
उगाचच  मुकजीवांना का पाळतो येथे.

नाही येथे कदर थोडीही माणूसकीची
भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे

वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही
मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे

काचाही मनाच्या साफ करावी माणसाने
सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे

आपल्या लाभासाठी  भांडतो हा माणसाशी
देवास  काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..