Nojoto: Largest Storytelling Platform

White गीतगझल... प्रेमाने जग जिंकू सारे, माणुसकीचे

White गीतगझल...

प्रेमाने जग जिंकू सारे,
माणुसकीचे देऊ नारे!

मतभेदांना मिटवू आणिक,
उघडू स्नेहाचे पेटारे!

वैर वाढते मनभेदाने,
लांब तयाला ठेवू या रे!

जग आहे हे सुंदर अवघे,
गीत गात वाजवू नगारे!

आकाशाची गडद निळाई
लुकलुकणारे पाहू तारे!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #milan_night
White गीतगझल...

प्रेमाने जग जिंकू सारे,
माणुसकीचे देऊ नारे!

मतभेदांना मिटवू आणिक,
उघडू स्नेहाचे पेटारे!

वैर वाढते मनभेदाने,
लांब तयाला ठेवू या रे!

जग आहे हे सुंदर अवघे,
गीत गात वाजवू नगारे!

आकाशाची गडद निळाई
लुकलुकणारे पाहू तारे!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #milan_night