या स्वार्थी गजबजलेल्या वस्तीत शोधावी कोणती आपली माणसं बोलून एक करून जातात इथं दुसरं या अनोळखी शहरात जगावं लागतं होऊन हासरं कोणी आपलसं करतं वेळ पाहून वेळ निघून जाता खेळ पाहतात दूर राहून आपला डाव सारा आपणच सावरायचा सवंगडी कोणी नाही आपणच खेळायचा कधी हात पसरावे लागतात पुढं हात सोडून पाया पडावं लागतं थोडं नको वाटतं हे सारं या अनोळखी शहरात पण जिंकण्यासाठी हारावं लागतं रिंगणात मित्रानों💕 आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो. मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही. तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात. चला तर मग लिहा यावर या अनोळखी शहरात. लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀 #याअनोळखी हे टँग करायला विसरु नका.