इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबाईलमध्ये माना डोकावून गेम्स खेळत होते तर काही कानात इअरफोन्स घालून फुल्ल व्हॉल्युममध्ये ढिनचॅक गाणी ऐकत होते. आपल्या आजूबाजूला आपले जिवंत मित्र बसलेत, त्यांच्याशी गप्पा मारायच्या सोडून ते आपल्या दुनियेत मग्न होते.येणाऱ्या जाणाऱ्यांची त्यांना काही एक पडली नव्हती. पण ही तर रिऍलिटी आहे ना. आजकाल आपुलकीची प्रजाती दुर्मिळ होत चालली आहे.इथे लोकांचे कान जरी उघडे असले तरीही त्यांना एखादी व्यक्ती जे मनापासून सांगण्याचा प्रयत्न करत असते ते समोरच्या व्यक्तीला ऐकूच जात नसतं.कोणालाही कोणाचं ऐकून समजून घ्यायचं नसतं किंवा मग इतका वेळही नसतो.अगदी या इअरफोन्स घातलेल्या मुलांसारखच.. मग मला वाटतं या संवाद न साधणाऱ्या मुलांचं तरी काय चुकलं ? --प्रेरणा #yqtaai #blogger #thoughts #marathiquotes #yqdidi #yqdiary