थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा ओला, थेंब अश्रूंचा हि ओला थेंब पावसाचा भिजवितो, थेंब अश्रूंचा हि भिजवितो थेंब पावसाचा जाणीव सुखाची थेंब अश्रूंचा उणीव सुखाची थेंब पावसाचा करी मन वेडे थेंब अश्रूंचा वेड्या मनातून घडे थेंब पावसाचा जाणीव कंपनांची थेंब अश्रूंचा जाणीव स्पंदनांची