.दिनांक --१२/१/२०२२ काव्य प्रकार शिरोमणी काव्य शीर्षक-- आम्ही जिजाऊस गाऊ थोर धन्य धन्य माय माऊली राजमाता असे शिवबांची माझी जिजामाता.. थोर सिंदखेडची राणी लेक जाधवांना झाली सुन भोसले घराण्यात आली.. थोर डंका अजरामर जिजाऊ कर्तत्वाचा जाहला शूर पराक्रमाने देशोदेशी गाजला.. थोर चेहरा आदर्श ओतप्रोत भरला सुपूत्र पोटी शिवबा जन्मला.. थोर लढाऊ वृत्ती आणि कणखर बाणा राजमाता जिजाऊचा आदर जाणा.. थोर मातृत्व माऊलीच्या टेकवून चरणावरी माथा गाऊ आम्ही जिजाऊची गाथा.. थोर प्रेरणा स्थान आई आदर्श जगात जिजाऊचे नाव अमर इतिहासात.. ©Smita Raju Dhonsale दिनांक --१२/१/२०२२ काव्य प्रकार शिरोमणी काव्य शीर्षक-- आम्ही जिजाऊस गाऊ