जिम्मेदार नागरिक महाराज, तुम्हीच शिकवल होत ना, की परस्ञी ही आपली आई-बहीण अाहे, पण रस्त्यानं चालताना जवा कुढुणतरी माल, सामान, आयटम अस एैकु येत ना, तवा मनाला खुप टोचत हो. महाराज, तुम्हीच सांगीतल होत ना, की शिक्षणानं मानुस सुधारतो, पण जवा शिकलेला बेराेजगार दिसतो, अन नालायक वशिला लावुन बढती घेतो ना, तवा मनाला खुप बोचत हो. महाराज, तुम्हीच शिकवल ना, की हक्कासाठी भिक मागु नका, तर हक्क मिळवायला शिका, पण आज जवा कार्यालयात काही कागद टेबलाखालुन पैसे दिल्याशिवाय मिळत नाही ना तवा खरच सर झुकत हो. बाबा, तुम्हीच संविधानात सांगीतल ना, की तुमचा हक्क तुम्हाला मिळेल , पण जवा हाच माणुस रडुन रडुन हकीकत सांगतो, अन विजय माञ आरोपीचा होतो, तवा पोटात खुप दुखतं हो खरच खुप टोचत हो ©Yogesh Bochare एकता