Nojoto: Largest Storytelling Platform

*घायाळ वास्तवाचे वारु* घायाळ वास्तवानंतरही प्रत्ये

*घायाळ वास्तवाचे वारु*
घायाळ वास्तवानंतरही
प्रत्येकाने पाहिलेले असते एक स्वप्न
जख्मी...,कटू...,रक्तबंबाळ...,अश्रूंनी भिजलेले...
अगदीच युद्धात हरलेल्या घोड्यासारखे ...
खरतरं स्वप्न म्हणजे काय रे...?
कदाचित सुर्यमालेतील ग्रह...?
छे, पण ते ग्रह सत्य ना...! मग,स्वप्न...?
अबोध मनाचे वेगवान वारु... दाही दिशांना उधळणारे वारु...,
आयुष्य घडवणारे वारु..., आयुष्य उद्ध्वस्त करणारे वारु...
मध्यरात्रीची्, पहाटेची शापीत शांतता भंग करणारे वारु...
कधी कधी देहाचा ताबा घेऊन संवेदनेवर राज्य करणारे अघोषित सम्राटाचे माजलेले वारु...
हे सर्व उमगते मनाला तरीही
घाळाय वास्तवानंतरही प्रत्येकाने पाहिलेले असते एक स्वप्न
अबोध जाणीवेचे एक क्रुर नृत्य...
अबोध जाणीवेचे एक क्रुर नृत्य...

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८ जीवनाची कविता
कवयित्री त्रिशिला साळवे#