*_छकुली आणि आजोबा_* संसार बघुनी तुझा भारावून गेलो मुली तुझ्या मुली तही मला तूच दिसतेस छकुली तिच्या स्पर्शाने अंगावर येतो सहारा नाजूक हात तिचे जसा अलगद वारा खेळता खेळता तिच्याशी जातो आयुष्याच्या मागे तिच्या चेहेर्यात तुझे रूप करतात क्षण जागे.... तिच्या निरागस डोळ्यात कितीतरी स्वप्न आकार घेतात मला परत लहान होण्यास ते मदत करतात.... तुझ्या वरचा राग आत्ता हस्स्यात विरून गेला एकदा पुन्हा हा बाप तुझ्या समोर पराजित झाला.... *किटी म्यावं* Father's feeling#love unconditional#poem