Nojoto: Largest Storytelling Platform

सोबत.. होते माझ्या सोबतीला पाचजण परत फिरले चार

सोबत.. 
 
होते माझ्या सोबतीला पाचजण 
परत फिरले चारजण 
नव्हते बोलत
कुणीच 
मुकी झाली होती शब्दसरीता 
स्मशानात भरली ती
फक्त भयाण
स्मशानशांतता 
जळताना ओढकेही रडत होते 
जगणंच एक जळणं
होतं हे 
सगळ्यांना ते शिकवत होते 
अर्थ नाही उरला या देहाला 
प्राण कधीच सोडून गेला 
अर्थ नाही प्राणवायुला 
जेव्हा त्याचा
खरा अर्थ
उमगला 
म्हणे त्या सोबतीला अर्थ होते  
देहाच्या तिजोरीत तेव्हा मात्र
रितेपणाच्या त्या खडखडाटाचे
फटाके वाजत
होते..
के.पी.

©शब्दवेडा किशोर #सोबत
सोबत.. 
 
होते माझ्या सोबतीला पाचजण 
परत फिरले चारजण 
नव्हते बोलत
कुणीच 
मुकी झाली होती शब्दसरीता 
स्मशानात भरली ती
फक्त भयाण
स्मशानशांतता 
जळताना ओढकेही रडत होते 
जगणंच एक जळणं
होतं हे 
सगळ्यांना ते शिकवत होते 
अर्थ नाही उरला या देहाला 
प्राण कधीच सोडून गेला 
अर्थ नाही प्राणवायुला 
जेव्हा त्याचा
खरा अर्थ
उमगला 
म्हणे त्या सोबतीला अर्थ होते  
देहाच्या तिजोरीत तेव्हा मात्र
रितेपणाच्या त्या खडखडाटाचे
फटाके वाजत
होते..
के.पी.

©शब्दवेडा किशोर #सोबत