Nojoto: Largest Storytelling Platform

गरीबी .... गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसत

 गरीबी ....
गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसतो की कोणी मोठेपणा मिरवत नाही ....
दु:खात अडचणीत एकमेकांना न बोलावता स्वत:हून मदत करतात . आनंदात हक्काने बोलवून जे आहे त्यात समाधान मानून आनंद साजरा करतात . मनमुराद खळखळून हसतात . आपुलकीने एकमेकांना सांभाळून घेत असतात ....
आजकाल पैसा आला की माणूस अचानक आपोआप फार मोठा होतो . लिव्हींग स्टॅंडर्ड बदलतो . लाईफस्टाईल बदलते . अगदी समाजा पेक्षा मोठा होतो अगोदरच्या शेजारी पै पाहुण्यांच्या पासून चार हात लांब त्याच्या विश्वातच राहू लागतो ....
गरीबीशी एकदा नाळ तुटली की मरेपर्यंत तो माघारी फिरुन देखील पाहत नाही .
एवढा सगळा फरक केवळ पैसा निर्माण करतो .... बॅंक बॅलन्स प्रॉपर्टी बंगला गाडी सुखवस्तू चैन ऐशोआराम मिळवण्यासाठी तो गरीबीतून बाहेर पडतो .✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator