#आयुष्य_जगताना.....? स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत. (कडू असो की गोड) एक स्वप्न पूर्ण झाल की, दुसर्या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य?, आयु÷ष्य हे न उलगडणारं कोडं आहे. आपण कितीही स्वप्न पाहिले तरी ते पूर्ण होतीलच असे नाही. ते पूर्ण झाले नाहीत म्हणून जगणं सोडायच का? या प्रश्नाचे उत्तर नाही, असेच येणे अपेक्षित असते. तसे लोकांच मन राखण्यासाठी आपण स्वप्नांच्यामागे धावत नसल्याचे भासवत असतो. परंतु, वास्तविक पहाता स्वप्ना मागे धावणे सोडत नाही. या स्थितीतून प्रत्येकजण कधीना-कधी मार्गस्त होतोच. ‘मुझे तुम्हे भूलाना है.. भुलू तो कैसे, जरा बताओ... ना हमने एक साथ वक्त बिताया है ...ना कभी दोस्ती निभाई है, फिर भी क्यों याद आते हो...क्या था ओ छुपके से देखना! या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न जेव्हा मी करतो. त्यावेळी एकाही प्रश्नाचे उत्तरं हाती लागत नाहीत. कधी-कधी वाटत या प्रशानंची उत्तरं कशासाठी हवीत, असा प्रश्न ही मी स्व:ला विचारतो. जगाताना कोणीही कधीही दुखावला जाऊ नये, असाच प्रयत्न माझा असायचा व आहे. आपल्या हातून कळत नकळत कोणाचे मन दुखावले गेलेले असते, कोणाचा अपमान आपल्या हातून झालेला असतो किंवा कोणाला खोलवर रुतणारी पीडा आपण दिलेली असती. अशावेळी त्या व्यक्तींची माफी मागण्यापलीकडे काय करू शकतो. पण, दुसरीकडे मी कोणाच्या नाकारण्याने अथवा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही कृतीने मी दुखावलो तर समोरच्या व्यक्तीने माझी माफी मागावी, अशी कधीच इच्छा झाली नाही आणि यापुढे होणार ही नाही. कारण, तो व्यक्ती त्याच्या जागी योग्यच आसतो. चुकीची असते ती वेळ. माळेपासून तुटलेले मणी एक एक करून माळेत पुन्हा गुंफणे यातच मी यश मानतो. काही अपवाद वगळता मला सर्वांनी माफ केले आणि माझी माळ आता एकसंध झाली आहे, असे वाटते. जे लोक माफी मागूनही परत आले नाहीत त्यांच्याबद्दल तीळ मात्र कटुता नाही, कारण तो त्यांचा निर्णय होता. जगणं आणि मरणं यात मानलं तर काहीच अंतर नाही. अन् नाही मानलं तर खूप मोठ अंतर आहे. आम्ही जगतो कशासाठी हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तो पर्यंत जगण्यात मजा नसते. ज्यावेळी आयुष्याच उद्दि÷ष्ट ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण करतो, त्यावेळीच खर्या अर्थाने आयुष्य जगण्याला सुरुवात होते. यातील फरक सगळ्यांना वेळेत उमजल असं नाही. वेळ निघून गेल्यावर उमजून तरी काय फायदा. यामुळे प्रत्येक निर्णय वेळेत घ्यायला हवा. तो निर्णय चुकीचा असला तरी त्यातून नवीन काही तरी अनुभव पाठीशी योतील. ते अनुभव भविष्यात नक्कीच कामी येऊ शकतात. त्यामुळे निर्णय घेताना निसंकोचपणे घेतला गेला पाहिजे. माझे अनेक निर्णय चुकले. त्यातून मी काय शिकलो याचे मूल्यमापन ज्यावेळी करतो त्यावेळी मात्र, बरं झाले माझे निर्णय चुकले, असेच काहीसे वाटते. माझे निर्णय चुकले नसते तर माझे पाय जमिनीवर राहिले नसते. मी घेतलेला निर्णय चुकत नाही, या अविर्भावात राहिलो आसतो आणि मी जे काही कमवले ते गमावलेे असते. तरी आयुष्य नाउमेद होऊन जगायच नसतं.✍️sandy✍️