Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे माझे नाते अतूट आहे,तू प्रत्येक ठिकाणी प्रत्ये

तुझे माझे नाते अतूट आहे,तू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस माझ्या सोबत आहेस.
लहान होतो जेव्हा मी वाडगा भरून तुला घ्यायचो आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
आम्ही दूध वापरत नसल्याने तुझा रंग ही काळा होता दिवस बदलत गेले तसा तू गोरा झालास.
मी ही दिवसागणिक बदललो जसा तू काळा असताना गोरा झालास तसा माझा वाडगा ही आता पेला झाला.
चपाती च्या जागी गोऱ्या चहाबरोबर बटर नि खारी आली जेव्हा जेव्हा नावडते जेवण बनले तेव्हा तेव्हा तुझ्यावरच अवलंबून पावासोबत पोट भरले.
तुझी सवय तर इतकी झाली की दिवसातून दोन वेळेस सोबतीला असणारा तू आता केव्हाही सोबतीला राहू लागलास,सकाळी नि दुपारी सोबत देणारा तू आता रात्री झोपताना ही सोबत देऊ लागलास.
वेळेनुसार तुझ्यात खूप बदल झाले पूर्ण असणारा तू कटिंग झाला नि तुझे अनेक नावं ही झाले.
कुठे तू उकाळा झालास,तर कुठे पिवर झाला कुठे रजवाडी झालास तर कुठे काळा पाणी झालास.
तुझी इतकी सवय झालीय की तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही ऑफिस ला गेल्यावर जो पर्यंत तुला भेटत नाही कामाला काही सुरुवात होत नाही.
एक मात्र कायम आहे की तुझी सोबत असल्यानेच अंगात एक वेगळीच ऊर्जा आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्रलेखन कसे सुरु आहे?
आज आपण चहा ला पत्र लिहुया.
मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रेमी असाल.
#प्रियचहा
 तुमचे पत्र लेखनाचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी