#जीवघेणा_ट्रॅक थकवा उशाशी घेवून ते निजले होते रात्रीचे अंधार काहीसे दुर्देवच ठरले होते काळाने नियतीला जणू बाजूला सारले होते चिरडून जाण्याइतपत नशिबाने आधीच पिढले होते समज कशी यावी ज्ञान -अज्ञान संभ्रम होते निवाऱ्यात पाखरांना आर्ततेने पोहचायचे होते खडतर रस्ता पायदळी तुडवत ते अंतर कापत होते थांबले अन् निजले तेथेच मृत्यूने कवटाळले होते चित्कार,आक्रोश अंधारला असेच अघटीत घडले होते रक्ताचे थारोळ्यात चिंधड्या पाहून सारे हळहळले होते शोककळा पसरली सर्वत्र त्याचेही कारण होते जीवघेणा ट्रॅक निर्जीव गेलेली माणसं सजीव होते ©®सौ.शितल हर्षल संखे #भयाण