Nojoto: Largest Storytelling Platform

*गागालगालगागा गागालगालगागा* कशास आई देऊन जन्म म

*गागालगालगागा गागालगालगागा*

कशास आई


देऊन जन्म मजला,कुढते कशास आई ?
दिनरात्र नेत्र ओले,रडते कशास आई ?


हाती तुझ्या न माझ्या,कन्या रुपात जगणे
सांभाळण्या मला तू,डरते कशास आई ?


मुलगी म्हणून मजला, झिडकारले कुणी जर
दुःखात लाकडासम,जळते कशास आई ?


स्त्री जन्म लाभणे हे,का ते तुझ्याच हाती ?
करुनी जिवास कष्टी,ढळते कशास आई ?


कर्तव्यदक्ष स्त्री तू,समजू नकोस अबला
शब्दांत त्या जनांच्या,अडते कशास आई ?


घेईन मी भरारी,गगनास पेलणारी
कमजोर मग उगा तू,ठरते कशास आई ?


जाणीव ह्या मनाला,साऱ्या तुझ्या ऋणांची
होईन ढाल तेंव्हा,लढते कशास आई ?


कमजोर बनवणारी, दुनिया असे विखारी
लाथाड तू रुढींना,खचते कशास आई?




*मीना पांचाळ* गझल
*गागालगालगागा गागालगालगागा*

कशास आई


देऊन जन्म मजला,कुढते कशास आई ?
दिनरात्र नेत्र ओले,रडते कशास आई ?


हाती तुझ्या न माझ्या,कन्या रुपात जगणे
सांभाळण्या मला तू,डरते कशास आई ?


मुलगी म्हणून मजला, झिडकारले कुणी जर
दुःखात लाकडासम,जळते कशास आई ?


स्त्री जन्म लाभणे हे,का ते तुझ्याच हाती ?
करुनी जिवास कष्टी,ढळते कशास आई ?


कर्तव्यदक्ष स्त्री तू,समजू नकोस अबला
शब्दांत त्या जनांच्या,अडते कशास आई ?


घेईन मी भरारी,गगनास पेलणारी
कमजोर मग उगा तू,ठरते कशास आई ?


जाणीव ह्या मनाला,साऱ्या तुझ्या ऋणांची
होईन ढाल तेंव्हा,लढते कशास आई ?


कमजोर बनवणारी, दुनिया असे विखारी
लाथाड तू रुढींना,खचते कशास आई?




*मीना पांचाळ* गझल