Nojoto: Largest Storytelling Platform

°अशीही फुले तशीही फुले° मोगरा गुलछडी सजवी गजर

°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 

 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ बनविले जातात. काही फुले त्या झाडाला विशिष्ट ऋतूत बहरला येतात. तर काही वेळेनुसार, उदा. पहाटे, सकाळी, सायंकाळी, रात्री फुलतात. काही फुलांची आपण फक्त नावेच ऐकलेली असतात. प्रत्यक्षात पाहिलेली नसतात. तर काहिंपाहीलेली असतात पण त्यांची नवे माहित नसतात. अशाच निरनिराळ्या फुलांची नावे काव्यात गुंफण्याचा छोटासा प्रयत्न!

devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon22