*फेसाळलेला अथांग सागर* *सांजवेळी कातर होतो* *धीर गंभीर आरोळ्यांनी* *पायखुणा त्या पुन्हा शोधतो..* *तरल हळवे नितांत सुंदर* *थवे उतरले निळ्या अंबरी* *झाकोळलेल्या कुसुमांना मग* *प्रभा लाभली गर्द केशरी..* *कुठे सांडला गंध केवडा?* *दाटून आला आर्त मारवा* *तार छेडीता नाद प्रसवला* *खोल उतरला राग केरवा..* *ढवळून गेला तळ मनाचा* *हाती गवसले चुकार मोती* *शिंपल्यात दडलेल्या ओळी* *ओठांवरती अवचित येती..* *पंखा वरती नक्षी कोरून* *स्वैर पाखरे विहार करती* *उबग येता गगनाचा मग* *मातीसाठी वणवण फिरती* ©Shankar Kamble #dost #समुद्र #किनारा #काठ #किनारे #सागरलाटा #विचार #मत